Lonavala : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पुन्हा (Lonavala) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. शनिवार रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम झाला आहे.

Pune : हवेली कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी दहा दहा मिनिटांचे ब्लॉग घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला (Lonavala) मिळत आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर गहूंजे गावात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला.या अपघातात टेम्पो चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत, तर शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. यामुळेदेखील  वाहतूक कोंडी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.