Pimpri : नारायणगावला शनिवारी बौद्ध वधू वर मेळावा 

एमपीसी न्यूज – जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील फक्त बौद्ध वधू-वरांसाठी वधू वर मेळावा आयोजित केला आहे. पालकांनी व वधू-वरांनी या मेळाव्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पॅंथर प्रा. राजेंद्र सोनावणे यांनी केले आहे.

हा मेळावा शनिवार दि. १८  मे ला सकाळी अकरा वाजता नारायणगाव येथील अशोका पॅलेस मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे.  बुद्ध जयंतीनिमित्त या बौद्ध वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी दलित पॅंथरचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे उपस्थित राहणार आहे. वधू वरांनी आपला रंगीत फोटो व बायोडेटा घेऊन स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.  मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 9657348622 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.