पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मैत्रिणीचा तसला व्हिडीओ केला व्हायरल; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मैत्रिणीला पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केलाय. याप्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.

Katraj News: बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. या दोघांची ओळख सोशल मीडियावरुन झाली होती. दोघे ही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असे आमिष तिला दाखवले. तिला अश्लील व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं. मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन तिने काही व्हिडिओ त्याला पाठवले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने एका पोर्न वेबसाईटवर अपलोड केले.

Solapur Accident : मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान पीडित मुलीच्या मैत्रीणीला एका अश्लील वेबसाईटवर तिचा हा व्हिडीओ दिसला. तिने पीडितेला याबद्दल माहिती दिली. पिडीत मुलीने कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली. मात्र कुटुंबीयांनी बदनामी पोटी याविषयी कुठेही वाच्यता केली नाही. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस पुढील तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.