Aalandi : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

इंद्रायणी जलप्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी केव्हा बैठक आयोजित करणार याकडे सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज-आज (दि.6 मे रोजी) इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळली.आळंदी येथे 1 मे रोजी इंद्रायणी (Aalandi) माता प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरू होते . काल (5 मे) प्रांत आधिकारी यांच्या लेखी पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी ,पुणे यांच्याशी चर्चा झाली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण संदर्भात निगडीत असलेल्या सर्व यंत्रणाची संयुक्तपणे बैठक 10 दिवसांमध्ये .तरी सदर बैठकीची तारीख वेळ निश्चित झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल.

इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषणा बाबत प्रशासनाने तातडीने दखल घेतली असल्याने  आपण इंद्रायणी नदी मध्ये होणारे प्रदूषण थांबविणे संदर्भात सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.या लेखी पत्रा मुळे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या उपोषण कर्त्यांनी साखळी उपोषण सोडले.

परंतु आज (दि.6 मे रोजी) इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून आली.सिध्दबेट जवळील जुन्या बंधाऱ्यातून हिवळसर पिवळसर पाणी नदीपात्रात पडून त्याचा मोठ्या प्रमाणात पांढरा फेस निर्माण होऊन पाण्यावर तरंगत होता.तसेच तेथील फेस वाऱ्यामुळे इतरत्र उडूनही जात असल्याचे चित्र दिसून येत होते.

पुन्हा एकदा जलप्रदूषणा मुळे इंद्रायणी नदी फेसाळली आहे. प्रांत आधिकारी यांनी दिलेल्या लेखी स्वरूपातील जलप्रदूषणाबाबत पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण संदर्भात निगडीत असलेल्या सर्व यंत्रणाची संयुक्तपणे बैठक 10 दिवसामध्ये लावण्यात येणार आहे.ती बैठक जिल्हाधिकारी केव्हा लावणार? याकडे आता (Aalandi) सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.