AAP : टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती (AAP) महमार्गावर एप्रिल 2023 पासून 18 टक्के केलेल्या टोलवाढीच्या विरोधात आपने आंदोलन केले.

शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली किवळे येथे महामार्गावर आज (बुधवारी) टोलवाढीचा निषेध करण्यात आला. पुणे एक्सप्रेस वेवर टोल वाढल्याने आता प्रवाशांच्या (AAP) खिशाला झळ बसणार आहे. वैयक्तिक वाहन वापरकर्त्यांना 1 एप्रिलपासून 18 टक्के वाढीव टोल टॅक्स मूळे खासगी बस आणि कॅबचे भाडे वाढणार आहे.

Chakan : भाव पडल्याने कांदा उत्पादक आक्रमक

मालवाहतुकदार,कारचालक यांना मोठा भुर्दंड बसणार आहे. 2008 च्या महामार्गशुल्क आकारणी नियमानुसार स्थानिक परिस्थितीनुसार टोल आकारणी केली पाहिजे. (AAP) महामार्ग निर्मिती प्रकल्प खर्च व देखभाल खर्च यांच्यानुसार टोल वसुली जाचक असता नये. मात्र टोलवसुलीची कंत्राटदार कंपन्यांच्या लाभासाठी टोल दरवाढ केली आहे, असा आरोप संतोष इंगळे यांनी केला आहे.

आंदोलनास संतोष इंगळे,यशवंत कांबळे,मीनाताई चंद्रमणी जावळे,सरोज कदम,ज्योती शिंदे,संतोषी नायर,ब्रह्मानंद जाधव,हारून अन्सारी,राहुल नाईक,संजय मोरे,सचिन पवार,अमर डोंगरे,कमलेश रनवरे, रोहित सरनोबत,अजय द्विवेदी,अशोक शेडगे,दिलीप खुडे,दिलीप कुमार,विनोद सरोज,संजय मोरया,सुरेंद्र कांबळे आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.