Vadgaon Maval : नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाची धडक; एक ठार, दोघे गंभीर

एमपीसी न्यूज – नातेवाईकामधील एकाच्या अंत्यविधी आटपून रस्त्याने पायी जात असलेल्या तिघांना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.20) रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे गावाजवळ झाला.

परमेश्वर धोंडीबा सवडे (वय 35, रा. जालना) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर राजेश देवीदास देशमुख (वय 50), बबन गंभीरराव ढवले (वय 55, रा. जालना) हे दोघेजण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब रंगनाथ सवडे (वय 60, रा. जालना) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सवडे यांच्या कान्हे येथे राहणाऱ्या नातवेईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी सवडे जालना येथून आले होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाईकांच्या घराकडे पायी जात असताना पुणे-मुंबई महामार्गावरील अतिथी हॉटेलजवळ परमेश्वर सवडे, राजेश देशमुख, बबन ढवले यांना पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत परमेश्वर सवडे यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर राजेश सवडे आणि बबन सवडे हे गंभीर जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडगाव मावळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.