Pimpri: साफसफाईची निविदा काढण्यास विलंब करणा-या अधिका-यांवर कारवाई करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाईचे काम निविदा प्रक्रिया राबवुन देणे आणि निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील कचरा गोळा करणे आणि त्यांची वाहतूक करणे या कामाबाबतही मागील दोन वर्षापासून आपण महापालिकेतील पदाधिकारी अधिकारी, नगरसेवक बीव्हीजी इंडिया या वादग्रस्त ठेकेदाराला निविदा प्रक्रियेला फाटा देऊन अर्थपूर्ण व्यवहार करुन वारंवार मुदत वाढ देण्यात आली आहे.

तशाच प्रकारे रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाईच्या कामासाठी ही सव्वा वर्षापासून मुदतवाढ दिली जाते. संबंधीत हे ठेकेदार आपले जावाई आहेत का? त्यामुळे महापालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाईचे काम निविदा प्रक्रिया राबवुन देणे आणि निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.