Pune : खुनातील 8 वर्षांपासून फरार आरोपी अखेर गजाआड

एमपीसी न्यूज –  श्रीधर खांदवे (वय 24, रा.नऱ्हे रोड) या तरुणाचा चौघांनी मिळून 2011 मध्ये निर्घृणपणे खून केला होता. या खुनातील 8 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी काल रविवारी (दि.20) दुपारी 1 च्या दरम्यान स्वारगेट येथून अखेर अटक केली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.

गोविंद ऊर्फ गोपी अशोक शहाणे (वय27, रा. नांदेडफाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्या आहेत. 2011 मध्ये श्रीधर खांदवे या तरुणाचा चौघांनी मिळून निर्घृणपणे खून केला होता. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून या गंभीर गुन्ह्यातील मागील 8 वर्षांपासून फरार असलेला आरोपी ‘गोविंद’ चा पत्ता मिळाला. त्याप्रमाणे पोलिसांनी गोविंदला स्वारगेट येथून अटक केली. पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी हवेली पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

गोविंद हा रेकोर्डवरील कुख्यात गुन्हेगार बंटी पवार याच्या टोळीतील सदस्य असून त्याच्यावर यापूर्वीचे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.