Pune : महापालिका करणार अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात खळखट्याक आंदोलन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते. पुण्यात देखील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांवर खळखट्याक करत बऱ्याच ठिकाणी फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर आता महापालिकेकडून देखील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाले बाबत सभासद, नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मनपाच्या जुन्या व पैठणमध्ये A,B,C वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यास जागा अपुऱ्या पडत असून त्यामुळे D आणि E वर्गवारीतील व्यवसायिकांचे, वाहतुकीचे व स्थानिक नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीचे अनुषंगाने पुनर्वसन करणे शक्य होणार नसून वाहतुकीस होणारा अडथळा विचारात घेता त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.