Pune : पुणे महानगरपालिका पादचारी दिवस हा अभिनव उपक्रम देशात राबवणारी पहिली महापालिका

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका पादचारी दिवस हा अभिनव उपक्रम ( Pune) देशात राबवणारी पहिली महापालिका असून यंदा आपण पादचारी दिनाचे तिसरे वर्ष साजरा करत आहोत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

पुण्यातील प्रतिष्ठित लक्ष्मी रस्ता या दिवशी वाहन विरहित करण्यात आला. नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक हा रस्ता वाहनांना बंद करून फक्तं पादचारी करण्यात आला. या शिवाय पुणे शहरातील 100 चौक देखील पादचारी सुरक्षा निश्चित करण्यात आले. आज पुणे महापालिकेच्या पथ विभागाने दर वर्षी प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करून दाखवला.

Ravet : पिंपरी चिंचवडमधील 14 वर्षांखालील शालेय मुलांसाठी खास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पथ विभागाने केलेल्या योजना व मागील पाच वर्षात केलेली कामे यंदा प्रदर्शित करण्यात आली , पदपथ नियोजन करताना महत्त्वाचे मापदंड या वेळी प्रदर्शित करण्यात आले , परिसर संस्थेच्या मार्फत सार्वजनिक व शाश्वत वाहतुक याचे महत्व,  सेव किड्स फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ते सुरक्षा कार्यशाळा , एकांश ट्रस्ट तर्फे विकलांग अपंग लोकांसाठी जनजागृती कार्यशाळा , साथी हाथ बढाणा संस्थेचे मानसिक आरोग्य या विषई पथनाट्य, त्र्यंबकेश्वर ट्रस्टतर्फे मर्दानी खेळ , रस्ता जॅमर्सतर्फे संगीत इत्यादी मनोरंजन उपक्रम होते . आज महामेट्रोने ई स्कुटी  ही विद्युत वाहन मेट्रोपासून घरापर्यंत प्रवासासाठी उपलब्ध केले.तसेच पीएमपीएमलने जादा बसचे नियोजन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अणि अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे हे कार्यक्रम प्रमुख होते , माजी मुख्य अभियंता व्ही.जी.  कुलकर्णी तसेच पर्यावरण विभागाचे प्रमुख माधव जगताप हेही मुख्य प्रमुख होते. लक्ष्मी रस्ता व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रांका , पाथरी संघटनेचे शंके उपस्थित होते. कार्यक्रम लोकांसाठी असल्याने सामान्य लोकांनी गर्दी केली व उपक्रमाचा आनंद ( Pune) घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.