Ravet : पिंपरी चिंचवडमधील 14 वर्षांखालील शालेय मुलांसाठी खास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन (Ravet ) व लायन्स क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवडमधील 14 वर्षांखालील शालेय मुलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान “अचीवर क्रिकेट मैदान”, रावेत येथे करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील, शालेय स्तरावर “क्रिकेट” या खेळाचा विकास व्हावा व नवोदित खेळाडूंना उत्तम स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी व त्यातून त्यांचे भविष्य घडावे, यासाठी प्रथमच “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या” माध्यमातून आंतरशालेय “क्रिकेट” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण 16 संघानी भाग घेतला असून ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.