Actors in politics : कलाकारांनी राजकारणात पूर्णवेळ यावे का ?

एमपीसी न्यूज : सध्या साधारण समाजमाध्यमांवर पाहत अथवा वाचत असताना कुठला न कुठला कलाकार हा कुठल्यानकुठल्या राजकीय पक्षात दाखल (Actors in politics) झाल्याची बातमी असतेच असते. त्या बातमी खालीच विविधांगी प्रतिक्रिया ही आलेल्या असतात. काहींनी त्या प्रतिक्रियांमध्ये शुभेच्छा दिलेल्या असतात. तर काहींनी अत्यंत नकारात्मक भाव प्रकट केलेले असतात.

काही वेळा तो कलाकार अशा प्रतिक्रियांनी व्यथित झाल्याचे ही दिसते. आपल्या लोकशाही मध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे कुणीही कुठल्याही पक्षाची विचारसरणी आत्मसात करून राजकारणात येऊ शकतो. त्याबद्दल कुणीच कुणालाच अडवू शकत नाही. आणि तस अडवण्याचा विचार हा हुकुमशाही विचार मानला जातो. आणि सुदृढ समाजाला अशी हुकुमशाही विचारसरणी मारक असते.

तो समाज खरच कुठल्याही पातळीवर पुढे जाऊ शकत नाही.

मात्र सुदृढ समाजामध्ये प्रत्येकाची काही अघोषित अशी कर्तव्ये असतात. काही कामे ही करावी लागतात. त्यापासून आपण तरी पळू शकत नाही. जस, शासनाचे काही चुकत असेल किंवा समाज आणि सरकार यांच्यातला दुवा व्हायचे काम कलाकारालाच करावे लागते. (Actors in politics) कधी शासनाच्या योजना, आणि कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कलाकारानेच करायचे असते. विरोधी पक्ष ही आपली बाजू मांडण्यासाठी कलाकारांची मदत घेऊच शकतो. त्यात काहीही चूक नाही. कलेमध्ये खूप ताकद असते. एखादी कला संपूर्ण समाजाला एकत्र करू शकते. तसेच समाजातील एकतेसाठी आणि समृद्धी साठी कला फार महत्वाची आहे.

मात्र जेव्हा कलाकार हा आतून अस्वस्थ असतो, अस्थिर असतो तेव्हा तो समाजासाठी निरपेक्ष भावनेने कला सादर करू शकत नाही. हे ही वास्तव आहे. त्यामुळे कलाकाराला सुरक्षिततेची भावना निर्माण करू देणे हे समाजाचे कर्तव्य आहे, फक्त त्यांचेच नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांचे ही हे कर्तव्य आहे.

मात्र आजकाल जरा नजर टाकली असता कुठेतरी आपण सगळेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विभागले जात आहोत, काही ठिकाणी तर समाजातील दोन लोकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोन पक्षांमुळे दरी निमाण होते आहे. आणि हे फार घातक आहे. भाऊ भाऊ आणि बहिणी बहिणी या विचारसरणी च्या या वरवरच्या युद्धात एकमेकांचे तोंड ही बघत नाहीत. किंवा एकमेकांचे पक्के शत्रू बनतात. उगीचच.

मुद्दा तो नाहीच आहे, ही असली युद्ध जेव्हा कलाकारांपर्यंत येऊन पोहोचतात, समजा तुम्ही समाजाची अधोगती निश्चित होते .आणि सध्या साधारण नजर टाकली तरी ही अधोगती दिसते. अशा वेळी कलाकारांनी स्वत: च विचार करण्याची गरज आहे, कि, आपण जावे का राजकारणात ? एक तर तुमचा वापर होत असतोच, राजकारणासाठी, त्यात पुन्हा तुमचे जे कलेचे चाहते असतात, ते ही तुमच्या अशा राजकारणात जाण्याने निराश होऊ शकतात. आणि सध्याच्या राजकारणात हे वास्तव कुणीच नाकारू शकत नाही, कि, तुमच्याकडून अपेक्षित काम झाले, तुमची गरज संपली कि, या राजकीय पक्षांकडून अनेकवेळेला तुम्हाला फेकून दिले जाते. मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या लेखी तुम्ही जिवंत आहात कि नाही, याची ही फिकीर केली जात नाही. त्यांच्यासाठी तुमच्या मागे हजारो पर्याय तयार असतात. हे वास्तव आहे. आणि त्या पर्यायामुळेच  तुमची किंमत शून्य असते.

आणि राजकारण हा सध्या धंदा झाला आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. इथे जलद गतीने पैसा मिळतो.आणि काही न करता श्रीमंत होता येते. अशीच समाजात धारणा आहे. आणि त्यामुळेच अनेक कलाकार राजकारणाच्या नादाला लागतात, त्यांना विचारसरणीशी वैगरे काहीही देणे घेणे नसते.(Actors in politics) आज या पक्षात, तर तिथे काही होत नसेल तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश. मग विश्वासार्हता कुठे राहाते ? आणि एकदा का कलाकाराची  विश्वासार्हता कलाकाराने गमावली कि, मग तो ना, राजकारणातला राहातो, ना समाजाच्या दृष्टीने त्याचा काहीही उपयोग राहत नाही. त्याने परत कलेत काहीही करण्याचा प्रयत्न केला, कि समाज त्याच्या कलाकृतीकडे संशयाने च पाहणार. मग त्याचे स्पष्टीकरण ही कुणी ऐकुन घेत नाही. आणि मग कलाकार संपतो….

आणि आज अनेको कलाकारांना राजकारण्यांनी संपवल्याची अनेक उदाहरणे आहेत, ती कलाकाराला संपवायची विशिष्ठ  पद्धत राजकीय नेत्यांनी आत्मसात केलेली आहे. त्याच पद्धती  इतक्या सोप्या  आहेत, कि राजकीय नेते सहज एखाद्या कलाकाराला धमकी तर देऊ च शकतात, “आमच्या बरोबर बरोबर आणि चुकीच्या कामाच्या वेळी राहिला नाहीस तर आम्ही तुला जिवंतपणे आयुष्यातून उठवू” आणि हे खर आहे, जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट हेतू ठेऊन राजकारणात प्रवेश करता, त्याच वेळी, तुमच्या पक्षातल्या तुमच्या समोर घडणार्या  अनैतिक गोष्टींवर तुम्ही उघडपणे बोलू किंवा लिहू शकता का ?  याचा आधी विचार झाला पाहिजे.

राजकारण आणि राजकीय पक्ष हे मुळात वाईट नसतात, पण, त्यातली लोक वाईट कामे करू शकतात. आणि त्यावेळेला ती लोक तुमच्या खांद्यावर पाय ठेऊन, (Actors in politics) तुमचा शिडी सारखा वापर करून ते पुढे जाऊ शकतात. आणि एकदा का शिडी चे काम झाले, शिडी नादुरुस्त झाली कि, ती शिडी भंगारात टाकून दिली जाते. तिच्या लाकडाचा काही वेळा जाळण्यासाठी ही उपयोग होतो .

त्यामुळे आपला शिडी सारखा उपयोग करू द्यायचा कि, आपले एक अस्तित्व जपायचे हे प्रत्येक कलाकाराने आपले आपले ठरवायचे,

इतकेच…….

   लेखक : हर्षल विनोद आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.