Bhosari: सर्वाधिक मताधिक्याने आढळराव यांना निवडून आणणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासोबत आपले मतभेद नाहीत. त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे, भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी)सांगितले. 

शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील संत ज्ञानेश्वर गार्डन मंगल कार्यालय येथे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत  होते. यावेळी महापौर राहुल जाधव, भाजप-शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.