Pune : राज्य सरकारचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार अजय भोसले यांना जाहीर 

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २०१५-१६ या वर्षासाठीचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सहाय्यक अभियंता  श्रेणी वर्ग १ अजय भोसले यांना जाहीर झाला आहे.

राज्यसरकारने २०१४ वर्षापासून रखडलेले विविध पुरस्कार आता जाहीर केले आहे. त्यात या पुरस्काराचा समावेश आहे. २०१५-१६ या वर्षासाठीचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर सर्वाजनिक बांधकाम विभाग उपविभाग घोडेगाव येथे कार्यरत असणारे सहाय्यक अभियंता श्रेणी वर्ग १ अजय भोसले यांना जाहीर झाला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, नगर-शिरुर रस्ता चौपदरीकरण, सिद्धटेक, देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअतंर्गत विविध विकास कामे करण्यात भोसले यांचे विशेष योगदान आहे. त्यामुळे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन भोसले यांचा गौरव केला जाणार आहे. भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे माझे आत्मबल वाढले असून अधिक जबाबदारीने काम करावे लागेल, असे उपअभियंता अजय भोसले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.