Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल  नाना काटे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवा नेते शेखर ओव्हाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गव्हाणे रहाटणी पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

औंध येथील जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. तसेच जुनी सांगवी येथे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून परिसरातील नागरिकांना तुळशीची रोपे वाटण्यात आली. याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक शिवाजी  पाडोळे सामाजिक कार्यकर्ते श्याम जगताप, सचिन आवटे, तानाजी जवळकर, अमरसिंग अदियाल अतुल काशिद, बाळासाहेब सोनवणे, भाऊसाहेब चांदगुडे, बाळासाहेब पिल्लेवार सतीश चोरमले महेश माने गणेश जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते.

पिंपरी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून व पिंपरी भाजी मंडई येथे स्वच्छता मोहीम राबवून व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करताना यावेळी युवा नेते पार्थ पवार,  शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी सभापती शिक्षण मंडळ फजल शेख, युवा नेते शेखर ओव्हाळ, नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे,  तसेच पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. तर युवा नेते शेखर ओव्हाळ यांच्या वतीने निगडी व चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे मोफत गुडघे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी सभापती शिक्षण मंडळ फजल शेख, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मासुळकर कॉलनी याठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वृक्षरोपण याप्रसंगी नगरसेवक समीर मासुळकर नगरसेवक राहुल भोसले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण भूमकर सलीम सय्यद विशाल मासुळकर रमेश रोंगे रिषभ पनिकर सागर आगळे रवी मंजलकर जयराज जोशी विवेक विधाते मोसिन खान आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.