BNR-HDR-TOP-Mobile

Akurdi : सेंट जोसेफ चर्चमध्ये पाम संडे साजरा

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये रक्तदान करून ख्रिश्चन बांधवांनी पाम संडे (झावळ्यांचा रविवार) साजरा केला. यावेळी फादर डेविस तारकन यांनी सकाळी प्रार्थना केली. त्यानंतर आकुर्डी परिसरातून फेरी काढली. चर्चमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५० जनांनी रक्तदान केले.
यावेळी रॉय थॉमस, जयसन पी, इम्यान्युएल, के.एम रॉय, बिजॉय, बिजू जोसेफ आदी उपस्थित होते. पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवारने होते.
HB_POST_END_FTR-A4

.