Akurdi : सहलीतून चिमुकल्यांनी जाणून घेतले भाजी अन फळांचे जग

एमपीसी न्यूज –  खेळा-खेळात खरेदी-विक्री, गाण्यातून (Akurdi ) गोष्टीतून भेटणाऱ्या भाज्या, फळे यांचे जग काल चिमुकल्यांनी जवळून अनुभवले . आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता दुसरी व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची खंडेराया भाजी मंडई आकुर्डी येथे शुक्रवारी (दि.13) शैक्षणीक सहल काढण्यात आली होती.

Pune : महापालिकेच्या कामामुळे पुढील दोन महिने भिडे पुलावरील वाहतूकीत बदल

दुसरी व इयत्ता चौथीचे 130 विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. रंगबेरंगी वेगवेगळ्या आकराच्या भाज्या, त्यांचे दर, विक्री करण्याची पद्धत मुलांनी सगळ जवळून पाहिले. विद्यार्थ्यांनी भाजी मंडई पाहण्याचा आनंद लुटला. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाजी विक्रेत्यांसोबत संवाद साधला, विविध भाज्यांची ओळख करून घेत भाजी खरेदी चा आनंद घेतला.

यावेळी वर्गशिक्षक नयना पाटील, युगंधरा पाटील, कोळप, वैद्य, ढाकणे, भोंगाडे हे विद्यार्थ्यांबरोबर (Akurdi ) सहलीत सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.