Pune : महापालिकेच्या कामामुळे पुढील दोन महिने भिडे पुलावरील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे पावसाळी वाहिनी टाकण्याचे (Pune) काम सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढील दोन महिने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra : धक्कादायक! सॅनिटरी पॅडमध्ये आणले साडेपाच कोटींचे कोकेन

डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (16 ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Pune : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 1.8 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक

केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मगर यांनी केले आहे. केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे , तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा. भिडे पूल, सुकांता हॉटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी (Pune) जावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.