Akurdi : विद्यार्थीनींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक कौशल्‍ये आत्मसात करावीत – प्रशांत आरदवाड

पीसीईटी महाविद्यालयात 'निर्भय कन्या अभियान' संपन्न

एमपीसी न्यूज – समाजामध्ये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्त्रीयांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचाराचा सामना करावा लागतो. कुटुंबात देखील असा प्रसंग उद्‌भवू शकतो. अशावेळी स्त्रीयांनी आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा वापर करावा. आवश्यकता असल्‍यास वेळप्रसंगी पोलीसांची मदत घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने विद्यार्थीनींसाठी ‘निर्भय कन्या अभियान’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी आरदवाड यांनी मार्गदर्शन केले.

  • कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ. एन. बी. चोपडे यांच्या हस्‍ते करण्यात आले. यावेळी पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, डॉ. शीतल भंडारी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजेंद्र जगताप, समन्वयक प्रा. स्वाती जाधव, प्रा. सुषमा परमार, प्रा. ज्‍योती कुलकर्णी, प्रा. सी. एस. लाडेकर, डॉ. संतोष शिंदे, प्रा. आनंद बिराजदार, प्रा. एम. पी. गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी आदरवाड यांनी सांगितले की, स्त्रीयांच्या रक्षणासाठी पोलिस कायम दक्ष असतात. अपु-या मनुष्यबळामुळे वेळप्रसंगी घटनास्थळी पोहचण्यास पोलिसांना वेळ लागू शकतो. अशा वेळी पिडीत महिलांनी हेल्पलाईन, पोलिस आपल्यादारी या योजनेतील संपर्क क्रमांकावर, दामिनी पथकांशी संपर्क साधावा. नोकरीच्या ठिकाणी स्त्रीयांनी आत्मविश्वासाने कसे वागावे, स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

  • योगाचार्य मारुती पेडेकर यांनी दैनंदिन जीवनामध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगाचा उपयोग यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगाव्दारे एकाग्रता, बुध्दीमत्ता, संयम, कार्यक्षमता वाढते. ऋता जोशी यांनी आत्मसंरक्षणासाठी विद्यार्थिनींनी कराटेंचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. या अभियानात 140 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत प्रा. राजेंद्र जगताप, सुत्रसंचालन प्रा. सुषमा परमार आणि आभार प्रा. स्वाती जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.