Akurdi : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरीतील महात्मा फुले कॉलेज, आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, (Akurdi) आयबीएमआर कॉलेज, ताथवडेतील बाजली लॉ कॉलेज तसेच चिंचवड विधानसभा,भोसरी विधानसभा अशी राष्ट्रवादी कडून 40 जणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा विद्यार्थी संवाद सायकल दौरा समाप्ती समारोह ग. दि. माडगूळकर सभागृहात पार पडला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, युवा नेते संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष सागर तापकीर, सचिन निंबाळकर आदी उपस्थित होते.

गव्हाणे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या (Akurdi) अडचणी समजून सांगितल्या आणि त्यांच्याकडून देखील समजून घेतल्या.

त्या कशा सोडवाव्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून ते आपणास पूर्णपणे त्या ठिकाणी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. गेली महिनाभर झालेल्या संवाद यात्रेसाठी केलेल्या मेहनतीचे कौतुक देखील केले.

Pune Breaking : कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाताना पाकीट वाटल्याचा सुषमा अंधारे यांचा मोठा आरोप…

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, की आज तुम्ही महिना भरात एवढे मोठे संघटन उभ करू शकता तर येणाऱ्या काळात नक्कीच हजार लोकांचा संघटन तुम्ही कराल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष राहुल आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. आहेर यांनी सायकल दौरा करत असताना महिना भरात विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधला त्या बाबत काय अनुभव आला हा सुनील गव्हाणे यांना सांगण्यात आला.

चैतन्य बनकर, वैष्णवी पवार, प्रतीक्षा पठारे, अभिषेक कांबळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तुषार गाडे, ऋषभ भडाळे, ज्ञानेश्वर पुदाले, चैतन्य बनकर, सुरज परमार, अभिषेक कांबळे, ऋतिक गायकवाड, अनुष्का काळभोर, अंकिता नाटेकर, सिद्धी माळी, विश्वा लोंढे, नितीन मोरे, संतोष माळी,हर्षद परमार, अक्षय शेडगे, योगेश देशमुख, फैजल तांबोळी,आणि दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.