Akurdi News : यात्रेनिमित्त आकुर्डीमध्ये 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : आकुर्डी गावचे (Akurdi News) ग्रामदैवत-कुलदैवत खंडोबा मंदिर हे आकुर्डी खंडोबा माळ येथे असून त्या ठिकाणी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी यात्रा भरणार आहे. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या काळात खंडोबा मंदिरात अंदाजे दोन लाख भाविक दर्शनास येत असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित सुरळीतपणे होण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीबद्दल करण्यात आले आहेत.

Pune : पुणे शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्ते तयार करण्यास प्राधान्य – मंत्री शंभूराज देसाई

निगडी वाहतूक विभाग अंतर्गत – Akurdi News

1) थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शन वरून खंडोबा चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहन नगर चिंचवड मार्गे इच्छित स्थळी बदलण्यात आली आहे.
2) परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबा माळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर.डी आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
3) चिंचवड, दळवी नगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबा माळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजुकडे वळून इच्छित स्थळी जातील.
4) जोक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबा माळ चौकातुन थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून हे गाणे सरळ चिंचवड स्टेशन दळवी नगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

वरील प्रमाणे वाहतुकीत बदल 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 रोजी 12 वा. ते रात्री 10 वा. दरम्यान आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.