Akurdi News: राष्ट्रीय कबड्डी, खो-खो खेळाडू शांताराम वायकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – कबड्डी, खो-खो खेळांचे राष्ट्रीय खेळाडू आणि आकुर्डी गावचे रहिवासी शांताराम परशूराम वायकर (वय 58 वर्षे) यांचे गुरुवारी (दि. 31 डिसेंबर 2020) निधन झाले.

शांताराम वायकर यांनी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि सुवर्णकन्या पी. टी. उषा यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले होते.

शांताराम वायकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख पदावर देखील काम केले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.