Maval Corona Update : दिवसभरात 11 जणांना डिस्चार्ज तर 09 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात रविवार (दि.3) 09 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 11जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 32आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 04 रुग्ण सापडले. सध्या रूग्णालयात 32 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7938 झाली आहे.

तर दिवसभरात 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 04 रुग्ण तर ग्रामीण भागात सोमाटणे 02, तळेगाव ग्रामीण, गहुंजे व भोयरे प्रत्येकी 01 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात 05 रुग्ण सापडले तर शहरी भागात 04 रुग्ण सापडले आहेत. तर 32 रुग्ण सक्रिय आहेत. 7683 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2368, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1577 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 531 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4475 रुग्ण तर ग्रामीण भागात 3462रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.