Pune News : पुणे आयुक्तालयात नवीन 5 पोलीस ठाण्याचा समावेश होणार

एमपीसी न्यूज – शहरातील पोलीस ठाण्याची मोठी हद्द कमी करून नव्याने 5 पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. 26 जानेवारीच्या मुहूर्तावर नवीन पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहेत.

त्यासंदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये प्रस्तवित पोलीस ठाण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हेगारीला लगाम लावण्यास मदत होणार आहे. पुण्यात हवेली नांदेड सिटी, लोणीकाळभोरला उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

त्याशिवाय चतुःश्रुगी पोलीस ठाण्याअंतर्गत बाणेर आणि चंदननगर पोलीस ठाण्याअंतर्गत वाघोली पोलीस ठाणे निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत पुणे पोलीस प्रयत्न करत होते. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शहरातील प्रस्तावित पोलीस ठाण्याबाबत उद्या आहे. अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत अधिक काही सांगता येणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.