Today’s Horoscope 04 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार सोमवार …. ​दि​.  04 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार –क्षयदिन.
  • आज विशेष –साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी 19.17 पर्यंत नंतर उत्तराफाल्गुनी.
  • चंद्र राशी –  सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -पिस्ता)

कुटुंबातील वातावरण अत्यंत आनंदी व उत्साही राहील. नवोदित कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. उच्चशिक्षित मंडळींना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

वृषभ – ( शुभ रंग -पांढरा)

दैनंदिन कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज आवक पुरेशी राहील. जागा विषयक प्रश्न सुटतील. प्रेम प्रकरणात मात्र डोक्याला फक्त मनस्ताप होईल. गृहिणींसाठी व्यस्त दिवस.

मिथुन – (शुभ रंग- मरून)

आजचा दिवस अत्यंत धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील. शेजारी घरोबा वाढेल.

कर्क – ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडेल. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील. आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील.

सिंह – (शुभ रंग – क्रीम)

तुमच्या सडेतोड बोलण्यामुळे काही हितसंबंधात कटुता येईल. डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्‍लिष्ट कामे ही आज सोपी होतील. आज संध्याकाळचा वेळ फक्त जोडीदारासाठी राखीव ठेवणे हिताचे.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्त्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज काही देणी चुकवावी लागतील.

तुळ – ( शुभ रंग -चंदेरी)

सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. विरोधक आज पळ काढतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- सोनेरी)

नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. नोकरीत जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. आज मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रमंडळींना आज दोन हात दूरच ठेवा.

धनु – ( शुभ रंग- निळा )

काम धंद्यात आज काही अनपेक्षित अडचणी येतील. तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एकांत हवाहवासा वाटेल. दान धर्माकडे कल राहील.

मकर – ( शुभ रंग -डाळिंबी)

आज एखाद्या विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

वैवाहिक जीवनात आज खेळीमेळीचे वातावरण असेल. काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घ्या.

मीन – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. काही येणी असतील तर आज वसूल होऊ शकतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.