Pimpri News : ‘आर्किटेक्चर’या क्षेत्रामुळे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल – प्रिया गोखले 

एमपीसी न्यूज : आर्किटेक्चरहे असे क्षेत्र आहे; ज्यामुळे तुम्हाला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. सरस्वती-लक्ष्मीया दोन्ही देवतांच्या (Pimpri News) आशीर्वादाने तुम्ही यश प्राप्त करू शकाल,असे मत वाईल्ड एन्जल फोरमच्या मुख्य संचालक आर्किटेक्ट प्रिया गोखले यांनी व्यक्त केले. 

आकुर्डी येथील पीसीईटीच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये प्रथम वर्ष आकिर्टेक्टला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच स्वागत समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गोखले बोलत होत्या. यावेळी तुळजा डिझाईन्सच्या संचालक आर्किटेक वासवी मुळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, डीन प्रियांका लोखंडे, प्रा. दीपिका कदम, प्रा. रोशनी देशपांडे, प्रा. नेहा अनवणे, प्रा. शिरीष मोरे आदी उपस्थित होते.

गोखले म्हणाल्या, प्रत्येक दिवस आपल्या समोर नव्या अडचणी घेऊन येत असतो. आपण त्यावर मात करून पुढे जातो. त्याप्रमाणे वास्तू रचनाकाराने काम करताना मुक्त विचार करत नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यासाठी अभ्यासाबरोबरच परिश्रम, उत्तम आरोग्यासाठी आनंदी वृत्ती, उत्साहीत राहिले पाहिजे. तरच आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता येईल, असे गोखले यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. सोनवणे यांनी महाविद्यालया विषयी माहिती दिली. एस. बी. पाटील आर्किटेक्चर काॅलेजचे नाव देशात उच्च प्रतीचे शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये घेतले जाते.(Pimpri News) जबाबदार नागरिक आणि हुशार वास्तू रचनाकार तयार करण्यासाठी पीसीईटीचे विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी कटीबद्ध असल्याची सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Pune News : BRTS ला दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन : ऍड. वंदना चव्हाण

वासवी मुळे म्हणाल्या की, आर्किटेकचे शिक्षण तुम्ही घेतले तरी सुद्धा एखादी वास्तू रचना कशी तयार करायची याचे शिक्षण मिळत नाही. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन ती वास्तू उभी करत असता. त्यासाठी आपले सहकारी, शिक्षक यांच्याशी सूसंवाद असणे आवश्यक आहे.(Pimpri News) एकमेकांच्या कल्पना, अनुभव यांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. तरच तुम्ही चांगले वास्तू रचनाकार होऊ शकता. अडचणींचा सामना केलेली व्यक्ती मोठी होते, यशस्वी होते. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणीप्रमाणे आपण कार्यरत राहिले पाहिजे.

पाच वर्षांच्या शैक्षणिक काळात भरपूर कष्ट करा. तुम्ही यशस्वी व्हाल, खडतर परिश्रमातून मिळालेला आनंद वेगळा असतो. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड कल्पनाशक्ती आहे.(Pimpri News) आपली बुद्धी एका स्पंज सारखे आहे. जे जे काही चांगले मिळेल ते शोषून घेऊन आत्मसात करून कार्यरत राहिले पाहिजे, असे मुळे यांनी सांगितले. यावेळी समृद्धी शिंदे नेहा कुटे या विद्यार्थिनींनी आपले शैक्षणिक अनुभव उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तन्वी दानेकर, आभार प्रियांका लोखंडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव शांताराम गराडे, खजिनदार विठ्ठल काळभोर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.