Akurdi : महापालिका निवडणुका कधी होणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले…

एमपीसी न्यूज – राज्यातील  महापालिका, नगरपालिका, जिल्हा (Akurdi) परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात आहे. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबर अखेर किंवा जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

संघटना वाढविण्यासाठी आरपीआयचे मेळावे, बैठका सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील आढावा बैठक आज (शनिवारी) आकुर्डीत झाली. बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी आठवले यांची पत्रकार परिषद झाली. महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा – डॉ. संजय आरोटे

नागालँडमध्ये आरपीआयचे आमदार आहेत. तिथे प्रादेशिक पक्ष म्हणून आमच्या पक्षाला मान्यता आहे. राज्यातही पक्षाला मान्यता (Akurdi) मिळवायची आहे. त्यासाठी संघटना वाढवीत आहोत असे सांगत आठवले म्हणाले,  2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

ही जागा आरपीआयला मिळावी अशी मागणी भाजपकडे करणार आहे. याबरोबरच मुंबई आणि विदर्भात आरपीआयची राजकीय ताकद आहे. या दोन विभागातून एका विभागातील लोकसभेची एक आणि शिर्डीची एक अशा दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.

याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 40 जागा निवडून येतील असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. मणिपूरबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. परंतु, विरोधकांच्या गोंधळामुळे मणिपूरवर चर्चा झाली नाही, असा आरोप त्यांनी विरोधकांवर (Akurdi) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.