Alandi : कमला एकादशी व अधिक मासानिमित्त आज माऊलींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज दि.12 रोजी आज आळंदीमध्ये कमला एकादशी व अधिक मासानिमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Alandi)संजीवन समाधी दर्शनाकरिता माऊलीं मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.आज एक लाखाच्या पुढे भाविकांनी मंदिरात माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली व दर्शन घेतले.

माऊलींच्या दर्शना करिता पान दरवाजाच्या येथून  दर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश देण्यात येत होता. महाद्वारातून भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. गणेश दरवाजा,हनुमान दरवाजा यावेळी बंद ठेवण्यात आला. याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

Akurdi : महापालिका निवडणुका कधी होणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले…

एकादशी निमित्त माऊलींच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.भाविकांना उपवासाच्या प्रसादाचे ( खिचडीचे) वाटप करण्यात आले.

तसेच इंद्रायणी घाटावरतीसुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. अधिक मासानिमित्त पवित्र इंद्रायणी नदी मातेचे भाविक पूजन करताना दिसत होते. तसेच भाविकांनी इंद्रायणी नदीत स्नानही (Alandi) केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.