Alandi : आळंदीत मद्यपींमुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : आळंदी येथील प्रदक्षिणा रस्त्यावरच मुबंई (Alandi) फुलवाले धर्मशाळे समोर एक मद्यपी दारूच्या नशेत रस्त्यावर झोपलेला होता. रस्त्यावरच झोपलेल्या या मद्यपीमुळे या रस्त्यावरून वाहने चालवण्याऱ्या वाहनधारकांना त्याचा अडसर निर्माण होत होता. याची तत्काळ दखल घेत वाहतूक पोलीस तिथे आले. व त्या मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या मद्यपीला तेथील नागरिकांच्या सहकार्याने उचलून फुटपाथवर एका बाजूला ठेवले. 

त्या मद्यपीला उचलून फुटपाथवर बाजूला ठेवल्याने तेथील वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली.

आळंदीमध्ये चाकण चौक, मरकळ चौक, चावडी चौक, नदी घाट परिसरात पद्ममावती रस्ता, सिध्दबेट परिसर व वडगांव रस्त्यावर सुद्धा मद्यपी मद्यधुंद अवस्थेत पडलेले असतात. नदीघाट परिसरात विशेषतः वैतागेश्वर मंदिर घाटपरिसरात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या मद्यपींची भांडणे चालू असतात.

यामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या (Alandi) भाविकांनादेखील  या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.  विशेषतः नदीघाटावर मद्यपींचा उपद्रव जास्त प्रमाणात चालू असतो. रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नदीघाटावर अनेक मद्यपी झोपलेले असतात. त्यामुळे नदीघाट परिसरात पालिका व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर  उपाय योजना करणे गरजेचे आहे. असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

https://youtu.be/fpNYpmTql2Y

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.