Maval : रविवारी समर्थ शलाका शिष्यवृती परीक्षेचे आयोजन; 765 विद्यार्थी देणार परिक्षा

एमपीसी न्यूज : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील (Maval) शाळेमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांंसाठी समर्थ शलाका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तळेगाव दाभाडे यांंच्या वतीने समर्थ शलाका शिष्यवृती परीक्षेचे आयोजन रविवारी 22 जानेवारी रोजी होणार असून 765 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

संस्थेच्या अंतर्गत येणा-या सर्व शाळामध्ये शालेय पातळीवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.

Pune News : ‘आव्वाज कुणाचा’ नारा देत बाल कलाकारांचा विजयी जल्लोष

 या परीक्षेचा प्रमुख उद्देश हा मुला मुलींना एमपीएससी, युपीएससी व इतर  स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, तसेच  पदवीधर झाल्यानंतर प्रशासकीय सेवेत अधिकारी निर्माण  व्हावेत व स्पर्धा परीक्षेची शालेय पातळीवरच या परीक्षेची माहिती व्हावी तसेच शालेय शिष्यवृती परीक्षेत रमणा-या विद्यार्थांंचा अभ्यासुवृतीचा पाया रचला जावा व त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर इयत्ता नववीत शिकणा-या 765 विद्यार्थांंची रविवार 22 जानेवारीस  पूर्व परीक्षा होणार आहे.

याची सर्व तयारी पूर्ण झाली असून यानंतर या परीक्षेत पात्र होणाऱ्या गुणवत्ता यादी नुसार पुन्हा  विद्यार्थांंची दुसरी मुख्य परीक्षा 26 फेब्रुवारीला  होणार असून या परीक्षेत गुणवत्ते नुसार  पात्र  ठरणाऱ्या  प्रथम तीन क्रमांकास पाच हजार एक,तीन हजार एक  व दोन हजार एक रुपये  तसेच  सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थांंना एक हजार एक रु सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रके तसेच सहभागी प्रत्येक शाळेमधून येणाऱ्या प्रथम क्रमांकास प्रत्येकी पाचशे रु प्रशस्तीपत्रक कै ॲड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख व नू म वि प्र मंडळाचे सचिव संतोष खांडगे,संस्था प्रतिनिधी व परीक्षा सह प्रकल्प प्रमुख संजय देशमुख व एकविरा विद्यालयातील अध्यापक व प्रकल्प समन्वयक उमेश इंगुळकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.