Alandi crime News : राका ऑइल कंपनीच्या गोदामातून 26 लाखांचे ऑइल लंपास

0

एमपीसी न्यूज – राका ऑइल कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी वेगवेगळ्या ऑइलचे 25 लाख 98 हजारांचे 273 बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी दहा वाजता चिंबळी येथे उघडकीस आली.

सुनील दिगंबर गीते (वय 37, रा. मोशी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राका ऑइल कंपनीचे चिंबळीमधील गायकवाड वस्ती येथे गोदाम आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत चोरट्यांनी गोदामाच्या शटरच्या लॉकपट्ट्या व आतील गेटच्या झडपेच्या लॉकची कडी उघडून गोदामात प्रवेश केला.

त्यानंतर 12 लाख 99 हजार 595 रुपयांचे मोबील एक झिरो डब्ल्यू 40 फॉर एलचे 138 बॉक्स, एक लाख 7 हजार 439 रुपयांचे मोबील एक एमजीएडब्ल्यूचे 11 बॉक्स, तसेच 11 लाख 91 हजार 630 रुपयांचे मोबील एक एमजीएडब्ल्यू 20चे 124 बॉक्स असे एकूण 25 लाख 98 हजार 664 रुपयांचे 273 ऑइलचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.