Alandi : आळंदीमध्ये डीपीला लागलेल्या आगीवर तत्काळ अग्निशमन दलाचे नियंत्रण

एमपीसी न्यूज : आज दि.10 रोजी आळंदी (Alandi) येथील चाकण रस्त्यावरील (विद्युत) डीपीला आग लागली होती. आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाला तिथे पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दल घटनास्थळी तत्पर पोहचले व तेथील आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. यामुळे तेथील पुढील अनर्थ टळला.

आग कश्याने लागली हे अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.