Chikhali : शेअर मार्केटमध्ये 350 टक्के परतावा मिळवून देतो म्हणत एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये 350 टक्के परतावा मिळवून (Chikhali) देतो म्हणत एकाची 25 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 13 नोव्हेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने घडली.

याप्रकरणी अमित प्रकाश बर्गे (वय 40, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अमित शहा, व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. यावेळी फिर्यादीचा विश्वास संपादन करून 350 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी सुरुवातीला रोआर्क कॅपिटल इंडिया या अपच्या माध्यमातून 15 लाख 83 हजार रुपये गुंतवले. या रकमेचे 1 कोटी झाले आहेत ते काढून घेण्यासाठी 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

Alandi : आळंदीमध्ये डीपीला लागलेल्या आगीवर तत्काळ अग्निशमन दलाचे नियंत्रण

मात्र आरोपी यांना त्यांची मुळ रक्क किंवा नफा काहीही परत न करता त्यांची 25 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केली  (Chikhali) आहे. याचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.