Talegaon : बजाज कंपनीचा बनावट माल विकल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बजाज कंपनीचा बनावट माल विकत स्वतःचा (Talegaon) मालकी हक्क दाखवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार तळेगाव दाभाडे येथे ठाकर वस्ती येथे शुक्रवारी (दि.9) दुपारी उघडकीस आली.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पियुश यशवंत राऊत (वय30, रा.डोबिंवली) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अमित अरविंद शहा (वय 56 रा. सोमाटणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Chikhali : शेअर मार्केटमध्ये 350 टक्के परतावा मिळवून देतो म्हणत एकाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणताही अधिकार नसताना बजाज (Talegaon) कंपनीचा माल नक्कल करत एकूण 36 हजार 416 रुपयांचा माल हा विक्रीसाठी ठेवून स्वामित्वाच्या हक्काचे उल्लंघन केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.