Alandi : एमआयटीच्या समीक्षाचे दिल्लीत पथसंचलन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील एमआयटी कला वाणिज्य व  (Alandi)विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका समीक्षा संतोष साळवे हिने दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभाग नोंदवला. विविध पातळ्यांवरच्या कठोर निवड प्रक्रियेला ती सामोरी गेली.

जिद्द व कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतातून निवड झालेल्या काही मोजक्या स्वयंसेविकेमध्ये तिचा अग्रक्रम लागतो. 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा एक महिन्याच्या राष्ट्रीय स्थरावरील रासेयो प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीर, नवी दिल्ली येथे सहभाग नोंदवला.

Pune : सामाजिक कार्य करणाऱ्या NGO CRP महिला बचत गट प्रमुखांचा सन्मान

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या मान्यवरांनी भेटून विद्यार्थ्यांचे कौतुक व (Alandi) अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बी बी.वाफारे, उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी व मानसी अतितकार, विभागप्रमुख या सर्वानी समीक्षाचे अभिनंदन केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी अरविंद वागस्कर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णा उबाळे, विकास यादव यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सर्व स्तरातून समीक्षावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.