Alandi : ऐन एकादशीच्या तोंडावर आळंदीकरांनी पुकारला बंद; विश्वस्तांच्या माफीची मागणी

एमपीसी न्यूज :श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आळंदीतील ग्रामस्थांना (Alandi)विश्वस्त म्हणून डावलल्याबद्दल 5 डिसेंबर रोजी आळंदी बंदची हाक समस्त ग्रामस्थ आळंदीकरांनी दिली होती. त्याचे निवेदन 3 डिसेंबर रोजी आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले होते.

त्याच संबंधित विषयावर काल आळंदी पोलीस स्टेशन यांनी समस्त आळंदीकर ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती.पोलीस प्रशासनाने आळंदी ग्रामस्थांचे म्हणे जिल्हा न्यायाधीश यांच्या पर्यंत पोहचवू असे त्यावेळी सांगितले होते.तसेच आळंदीकर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने व शांततेत आळंदी बंद राहील. व्यापारी वर्गाचा आम्हाला त्या संदर्भात पाठींबा आहे पोलीस प्रशासनास सांगितले.

Pune : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

तसेच विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला (Alandi)माहिती देताना आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून निषेध होत आहे. तसेच त्यांनी ते वक्तव्य मागे घेऊन ग्रामस्थांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली.

आज दि.5 रोजी सकाळ पासूनच आळंदी बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसरातील व शहरातील विविध ठिकाणच्या विविध व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवली.

 

सकाळी चाकण चौकाच्या येथून हरिनामाच्या टाळ, मृदुंगाच्या गजरात या मोर्चा ला सुरवात झाली.महाद्वारात त्याची सांगता झाली.
यावेळी बहुसंख्येने या मोर्चात आळंदी ग्रामस्थ नागरिक, वारकरी संप्रदायाचे मान्यवर,व्यापारी वर्ग व विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी डी डी भोसले पा. पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड स्मिता घुंडरे,गोविंद गोरे ,संजय घुंडरे पा. यांनी मनोगते व्यक्त केली.व विश्वस्त योगेश देसाई यांच्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.

त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.आळंदी ग्रामस्थांचे वारी काळात यात्रे काळात असलेले योगदान व सहकार्य याबाबत माहिती मान्यवरांकडून देण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे ,प्रकाश कुऱ्हाडे,राम गावडे,साहेबराव कुऱ्हाडे,रामभाऊ भोसले,लोंढे महाराज,शंकर कुऱ्हाडे,रोहन कुऱ्हाडे, अनिकेत कुऱ्हाडे, सतीश कुऱ्हाडे,आरिफ शेख,ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे ,संतोष भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.