Chinchwad: पत्नीच्या परस्पर फ्लॅटची केली विक्री, पतीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पती व पत्नीच्या नावे असलेला फ्लॅट पतीने परस्पर (Chinchwad)विकला असता पत्नीने थेट पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली आहे. हा सारा प्रकार 2012 ते आजपर्यंत चिंचवड येथे घडला आहे.

यावरून सोमवारी (दि.4) पत्नीने पती विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पतीवर फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : वर्षभरात नागरिकांना 1 लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देणार – अतुल सावे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील (Chinchwad)शिल्पलेखा या या बिल्डींगमध्ये फिर्यादी व त्यांच्या पतीचा फ्लॅट आहे. या फ्लॅटचे कुलमुखत्यारपत्र फिर्यादी यांच्या नावे आहे. या कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत पतीने परस्पर या फ्लॅटची विक्री केली. याप्रकरणात  फिर्यादीची 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.