Chakan : क्रेडीटवर मशिन खरेदी करत कंपनीची पावणे सहा कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीचा विश्वास संपादन करून (Chakan)फर्मसाठी 6 कोटी रुपयांच्या 6 मशीन क्रेडीट वर खरेदी केल्या. मात्र त्यातील केवळ प्रेसेसिंग फीचे पैसे देत कंपनीची तब्बल पावणे सहा कोटींची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार ऑक्टोबर 2019 ते आज अखेर पर्यंत चाकण व हैद्राबाद येथे घडला आहे.

याप्रकरणी अमित सिंह कुशावह (वय 46 रा.बाणेर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कृष्णराव ( प्रुदवी ग्रेनाईटस फर्म, हैद्राबाद, तेलंगना ) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला.

Alandi : ऐन एकादशीच्या तोंडावर आळंदीकरांनी पुकारला बंद; विश्वस्तांच्या माफीची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Chakan)आरोपी हा प्रुदवी ग्रेनाईटस फर्म, हैद्राबाद याकंपनीत भागीदार असून त्याने फिर्यादी यांच्या सॅनी हेव्ही इंडस्ट्री इंडिया या कंपनीकडून 6 कोटी 40 लाख 74 हजार रुपयांच्या 6 मशीन क्रेडीटवर खरेदी केल्या.

त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता आरोपीने प्रोसेसींग फीस मशीन खऱेदी पोटी असलेली रक्कम अशी केवळ 69 लाख 30 हजार 61 रुपये परत केले. यावेळी फिर्यादीच्या कंपनीने विक्री केलेल्या मशीन परत मागितल्या असता आरोपीने त्या लपवून ठेवल्या. फिर्यादीच्या मशीन किंवा मशीनचे पैसे परत न करता फिर्यादी यांच्या कंपनीची 5 कोटी 77 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.