Alandi Potholes : पद्मावती रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज : आळंदी येथील दि. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या महासेवा दिन कार्यक्रमात नवरात्र उत्सवानिमित्त पद्मावती रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते डी डी भोसले पा. यांनी केली होती. (Alandi Potholes) त्यांची ती मागणी संबंधित ठेक्केदाराने मान्य केली असून पद्मावती रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत माहिती भोसले पा. यांनी दिली आहे.

Vehicle theft : वाहन चोरी करणाऱ्या सराईतांना अटक, 15 गुन्हे उघड

नवरात्र उत्सवा दरम्यान पद्मावती मातेच्या दर्शनासाठी या रस्त्यावरून अनेक महिला अनवाणी पायी जात असतात .तसेच यादरम्यान अनेक वाहनांची रहदारी ही दर्शनासाठी या रस्त्यावरून चालू असते.(Alandi potholes) येथील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दि.22 सप्टेंबर रोजी पद्मावती रस्त्याबाबतचे वृत्त एमपीसी न्यूजने  प्रसारीत केले होते. त्याबाबत त्यांनी एमपीसी न्यूजचे आभार मानले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.