रविवार, सप्टेंबर 25, 2022

Vehicle theft : वाहन चोरी करणाऱ्या सराईतांना अटक, 15 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज : वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईतांना अटक करत पोलिसांनी 15 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. (Vehicle theft) ही कारवाई कोंढवा पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी केली आहे.

यश सागर ओंबळे (वय 21 रा. येरवडा), पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल (वय 24 रा.येरवडा) या दोघांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन यांना दोन संशयीत हे दुचाकीवरून गाड्यांची टेहळणी करत असल्याची माहिती मिळाली.(Vehicle theft) त्यानुसार पोलिसांनी घटनास्थली जाऊन सापळा रचून यश व पृथ्वीसिंग यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी सात दुचाकी व दोन मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, दोन अपल कंपनीचे आय पॅड असा एकूण 3 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

KYC update fraud : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची एक लाख रुपयांची फसवणूक

पुढे पोलिस तपासात कोंढवा पोलीस ठाण्यातील 4, हिंजवडी पोलीस ठाण्यातील 4, वानवडी पोलीस ठाण्यातील 2, हडपसर, चतुःश्रृंगी, स्वारगेट, विमानतळ, (Vehicle theft) विश्रांतवाडी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण 15 गुन्हे यावेळी पोलिसांनी उघडकीस आणले. याचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

 

 

spot_img
Latest news
Related news