Alandi : शरद पवारांनी घेतले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ढोल ताश्यांच्या (Alandi) गजरात,फटकाच्या आतिषबाजीत व वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या हरिनामाच्या गजरात आळंदी ग्रामस्थांनी स्वागत केले.यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरातील  दगडी सभामंडपाच्या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

 

 हजेरी मारुती येथे ग्रामस्थांच्या वतीने हार,श्रीफळ,शाल, गदा व संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती  देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शरद पवार यांनी माऊलीं मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले .खासदार श्रीनिवास पाटील व इतर मान्यवर यावेळी उपस्थित (Alandi) होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.