Alandi News : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी देवाची येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नाद करायचा नाय ! (Alandi News) ‘वार्षिक स्नेहसंमेलन 2022–2023’ 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.दररोज होणाऱ्या या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमा बरोबरच इतरही कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली.

मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायं. 5 वा.वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन समारंभ  ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के (प्रमुख – श्री जोग महाराज सेवा संस्थान, आखेगाव, ता.शेवगाव, जि. अ.नगर) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रल्हाद राठी(उद्योगपती, पुणे) यांचे शुभहस्ते,प्रल्हाद मुरकुटे (सदस्य – जि. प. परभणी) प्रकाश कवठेकर (सदस्य – जि.प. बीड),सुनिल गोडसे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी पोलीस स्टेशन) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न होणार आहे.

विशेष आकर्षण  म्हणून ज्ञानेश्वर मेश्राम (सा रे ग म प फेम, झेंडा, संत तुकाराम, मोरया, एक तारा या चित्रपटातील पार्श्वगायक) हे उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि.28 डिसेंबर रोजी सायं. 6 वा.नारायण गावडे (उद्योगपती)यांच्या वतीने गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप समारंभ. ह.भ.प. भागवत महाराज साळुंके  (अध्यापक –ओळख ज्ञानेश्वरीची) यांच्या अध्यक्षतेखाली व विकास नाना दांगट  (संचालक –पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Pimpri News : रोहन कवडे ठरला भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित ‘वक्तृत्व स्पर्धेचा विजेता

या दिवशी विशेष आकर्षण म्हणून ह.भ.प. दासोपंत स्वामी उंडाळकर व ह.भ.प. सिद्धेश्वर उंडाळकर यांची सोलो वादनाची जुगलबंदी होणार आहे.गुरूवार दि.29 डिसेंबर रोजी सायं.6 वा. प्रशालेतील बालोद्यानाचा नामकरण समारंभ व या दिवशीचे विशेष आकर्षण कौस्तुभ गायकवाड (महाराष्ट्राचा महागायक, लग्नाळू फेम, “गौरव महाराष्ट्राचा महाविजेता”) यांच्या शुभहस्ते  होणार आहे.शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी सायं.6 वा. प्रशालांना मिळालेल्या आय.एस.ओ. प्रमाणपत्राचा प्रदान समारंभ ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे (आळंदी देवाची) यांच्या अध्यक्षतेखाली व अंकुश जाधव  (मुख्याधिकारी) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून सोहम गोराणे (बालकलाकार – झी युवा संगीत सम्राट फेम) हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. “ओळख ज्ञानेश्वरीची– एक संस्कारक्षम उपक्रम” (पर्व पहिले/ प्रथम बॅच ) समारोप समारंभ मा.अवधूत गांधी (सोनी टी.व्ही.वरील संत ज्ञानेश्वर माऊली मालिकेत ‘संत नामदेवांची भूमिका साकारणारे, प्रसिद्ध पार्श्वगायक) यांच्या अध्यक्षतेखाली व  वरूण भागवत (सोनी टी.व्ही.वरील संत ज्ञानेश्वर माऊली मालिकेत ‘माऊलीं’ ची भूमिका साकारणारे) तसेच विलास काटे पालखी पत्रकार (Alandi News) संघ सचिव( पंढरपूर ते घुमान पंजाब सायकल रॅलीचे व संत माऊलीं-संत नामदेव प्रचारक प्रसारक)राधेश पाटील बधाले (साहित्यिक व विश्वस्त गाडगे बाबा धर्मशाळा,पंढरपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणारे मान्यवर व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांमध्ये संपन्न होणार आहे.  नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.