Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे.

राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले, की महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू होतील.

Pimpri : फॅमिली फिजीशियन असोसिएशनची पिंपरी-चिंचवडची नवीन कार्यकारीणी जाहिर

उपोषणस्थळी आज जगन्नाथ बापू शेवाळे यांनी सदिच्छा भेट (Alandi) देत या उपोषणास पाठिंबा दिला आहे. तसेच बबनराव कुऱ्हाडे माजी नगराध्यक्ष, नंदकुमार कुऱ्हाडे, अनिल महाराज तापकीर, रंगनाथ बोराटे, भाऊसाहेब कोळेकर, गणपतराव कुऱ्हाडे, सतीश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, मंगेश तिताडे व आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवर यांनी उपोषणस्थळी जाऊन इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषणास पाठींबा दिला.

तसेच आजसुद्धा सिध्दबेट जुन्या बंधाऱ्या खालील नदीपात्र जलप्रदूषणामुळे फेसाळलेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.