Pimpri : फॅमिली फिजीशियन असोसिएशनची पिंपरी-चिंचवडची नवीन कार्यकारीणी जाहिर

एमपीसी न्यूज – फॅमिली फिजीशियन असोसिएशनची (एफपीए) पिंपरी-चिंचवड ची नुकतीच ( Pimpri) आठवी सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.17) पार पडली. यामध्ये 2024-25 साठी नवीन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.

फॅमिली फिजीशियन असोसिएशन तर्फे ज्युपिटर हॉस्पीटलच्या सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी गेल्या दोन वर्षाच्या कार्य काळातील पीएसटी यांचे अहवाल माडण्यात आले.तसेच संस्थेची प्रगती व संस्थेपुढील आव्हाने  यांचा गोषवारा माडण्यात आला.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरिता भोईर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Pune : राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने थिएटर का नाही – नसीरुद्दीन शाह

या सभेत जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. अजित पाटील, सचिव म्हणून डॉ. महेश शेटे, खजिनदार म्हणून डॉ. योगेश पाटिल यांची निवड कऱण्यात आली.याच बरोबर डॉ. स्वप्ना डांगमाळी यांची संयोजक व प्रवक्ते म्हणून डॉ. सुर्यकांत भिसे तसेच डॉ. शार्दुल पंचवाडकर यांची निवड करण्यात आली.

फॅमिली फिजिशियन असोसिएशन ही संघटना आठ वर्षापासून पिंपरी चिंचवड व परिसरात कार्यरत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्या संस्थेचे  योगदान आहे. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी आणि त्यांनी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.