Alandi : व्हाट्स ग्रुपवरील अतिक्रमणाबाबत केलेल्या पोस्टची मुख्याधिकाऱ्यांनी घेतली तत्काळ दखल

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) प्रदक्षिणा रोडवर वाहतूक तर असतेच व सारखी वर्दळही असते. हजेरी मारुती जवळील फुटपाथवर नवीन अतिक्रमण करत भाजी मंडई तयार होत आहे. अपघात झाल्यास जीवावर बेतेल, अशी स्थिती तिथे आहे. दुर्लक्षामुळे आता भाजीवाले वाढले असून याबाबत माहिती सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख यांनी एका व्हाट्स ग्रुपवर दिली. त्याची तत्काळ दखल मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी घेतली. व त्याबाबत अतिक्रमण विभागाला सूचना केल्या.

अतिक्रमण विभागाने तत्काळ तेथील फुटपाथवरील भाजीवाल्यांचे अतिक्रमण काढले. तत्काळ कारवाई केल्याबद्दल आरिफ शेख यांनी मुख्याधिकारी व पालिकेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.