Pimpri : पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत पोहायला गेलेला आठ वर्षीय मुलगा पवना नदी (Pimpri )पात्रात बुडाला. पिंपरीगाव येथील बोट क्लबजवळ रविवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर मंगळवारी (दि. 30) सापडला.

विशाल भीम थापा (वय 8, रा. इंद्रायणीनगर, डिलक्स चौक, पिंपरी, मूळ रा. नेपाळ) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विशाल हा त्याच्या काही मित्रांसोबत (Pimpri )पवना नदीत पोहायला गेला. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

Chinchwad : कायझेन स्पर्धेला उद्योग समूहांचा भरघोस प्रतिसाद; 469 स्पर्धकांचा सहभाग

त्यानंतर तीन दिवस थेरगाव आणि पिंपरी अग्निशमन विभागाचे जवान सातत्याने पवना नदी पात्रात विशाल याचा मृतदेह शोधण्याचे काम करीत होते. मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ विशाल याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

विशाल याचे वडील भीम काशीराम थापा हे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याची आई मीना थापा मजुरीचे काम करतात. तसेच विशाल याला एक चार वर्षीय भाऊ आहे. मूळचे नेपाळ येथील असलेल्या भीम थापा यांनी त्यांच्या दोन मुलांना आणि पत्नीला दोन महिन्यांपूर्वी नेपाळ येथून पिंपरीत आणले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.