Pune :मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या (Pune)सर्वेक्षणाला दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा आयोगाने घेतलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सर्वच ठिकाणी शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे कारण देत आयोगाने (Pune)सर्वेक्षणाच्या कामासाठी मंगळवारी मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

Chinchwad : कायझेन स्पर्धेला उद्योग समूहांचा भरघोस प्रतिसाद; 469 स्पर्धकांचा सहभाग

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागास आयोगाने23जानेवारीपासून सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. त्यासाठीचे अॅप गोखले इन्स्टिट्यूटने तयार केले होते. पण, सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसापासून अॅपमध्ये अनेक तांत्रिक अडथळे आल्याने त्याचा फटका सर्वेक्षणाला बसला आहे.

राज्यातील अनेक गावांची नावे अॅपमधून गायब झाली आहेत. तसेच देहू, इंदापूरसारख्या अनेक नगरपालिकांची नावेही समावेश केली नसल्याने त्या त्या ठिकाणी सर्वेक्षण होऊ शकले नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासून सर्वेक्षणात अडथळे निर्माण झाल्याने सर्वेक्षण पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. त्या सर्व पार्श्वभूमीवर 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.