Alandi : वरुथिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज :  आळंदी मध्ये वरुथिनी एकादशी निमित्त रविवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती.(Alandi) मंदिर परिसर तसेच इंद्रायणी घाट परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिरा मध्ये भाविकांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचे आयोजन देवस्थान मार्फत करण्यात आले होते.

वरुथिनी एकादशी निमित्ताने मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती. तसेच काही भाविक भक्त सिध्दबेट व माऊलींच्या भिंतीच्या स्थळा कडे दर्शनासाठी जाताना दिसत होते. प्रदक्षिणा रस्त्यावर दुतर्फा चारचाकी वाहने लागल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता.

Pune : चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी खुला

नो पार्किंग च्या ठिकाणी म्हणजेच प्रदक्षिणा रस्ता चारचाकी वाहने व मंदिर परिसरात दुचाकी वाहने लागत आहेत. तिथे वाहने लागू नये यासाठी प्रशासनाकडून  अजूनही तोडगा निघाला नाही.(Alandi) याबाबत चर्चा मात्र सोशल मीडियावर रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.