Uddhav Thackeray : वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज : महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, धर्माधिकारी यांचा गौरव झाला याचा आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.(Uddhav Thackeray) पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला? सच्चा माणसासमोर झुकावं लागतं, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. धर्माधिकारी व्यसनमुक्तीसाठी काम करतात, पण सत्तेची नशा देश उद्धवस्त करते,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

अमित शाह यांना लक्ष करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. जे देशभर ते म्हणाले आहेत की, मी हल्ली शब्द जपून बोलत आहे. तरी नेभळट हा शब्द गेलाच. काही दिवसांपूर्वी मी फडतूस शब्द वापरला होता. त्यावरून वाद निर्माण झाला.

मुख्यमंत्री शिंदे हे अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येला मी गेलो होतो. त्यावेळी सुनील केदार सुद्धा होते. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. पहिले मंदिर असं आम्ही म्हणत होतो. त्यावेळी ते नाही म्हणत होते. मात्र कोर्टाने निर्णय दिल्यावर हे टीकोजीराव आम्ही राम मंदिर केले सांगत आहेत.

ते म्हणाले, खरंच यांच्यात हिंदुत्व असतं, तर हे गुवाहाटीमध्ये नाही तर अयोध्येला गेले असते. आता दोघंही सोबत गेले, हेही कधी गेले नव्हते. राम राज्य कधी या देशात येणार. (Uddhav Thackeray) शेतकरी संकटात आहेत आणि मुख्यमंत्री देवदर्शन करत आहेत.

Alandi : वरुथिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

शिंदे- फडणवीस सरकारला लक्ष करत ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे घरबाहेर पडले नाही, असा आरोप व्हायचा. मग आमचे सहकारी काय करत होते. घरून काम होत होतं. म्हणून देशात पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात आहेत. पंतप्रधान हे समोर येऊन बोलत नाही.

आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांना मोठं करण्यासाठी होतो. यांचे मित्र श्रीमंतांच्या यादीत वर जात आहेत, पण गरीब मात्र खाली जातोय,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सरकार अवकाळी आहे. ‘उलट्या पायाचं सरकार आलं आणि सतत गारपीट होत आहे.अयोध्येला मीसुद्धा गेलो होतो. ती वेळ वेगळी होती. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. (Uddhav Thackeray) आधी मंदिर मग सरकार, आम्ही मोदींना सांगितलं. मोदी म्हणाले आता नको. आता हे टिकोजी राव फणा काढतोय. हे रामभक्त असते तर सुरतला नाही तर अयोध्येला गेले असते. आताचे उपमुख्यमंत्री आधी कधी अयोध्येला गेले नाहीत. माझा शर्ट अधिक भगवा दाखवण्यासाठी गेले,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर केली.

शेतकरी ओरडत आहेत, पंचनामे नका करू आमच्या मैताला या, हे तिकडेही जातील. नुसते वणवण फिरल्याने काम होत नाही. मी घरात बसलो म्हणून अनेक जण टीका करत होते, पण मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्या पाचमध्ये आलो,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.