Pune : चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज : पुणे शहारातील चांदणी चौक पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हा नवीन पूल येत्या काही दिवसांत खुला होणार आहे. या पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. (Pune) पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणेकरांना आणखी एक चांगली सुविधा या पुलाच्या माध्यमातून मिळणार आहे. चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. तसेच यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे चांदणी चौकातून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्गाने जाताना वेळ वाचणार आहे. या मार्गातून मुळशी पौड मार्गे पुढे कोकणात देखील जाता येणार आहे. यामुळे मुळशीकडे जाणारी वाहतूक कोंडी आता थांबणार आहे.

Pimpri : टोळक्यांमधील वादात सर्वसामान्यांची वाहने होतात टार्गेट; भुरटी भाईगिरी संपविण्यात पोलीस अपयशी

भुयारी मार्गात अनेक रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. संपूर्ण मुळशी तालुक्याचे वैशिष्ट्य सांगणारे वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्र या भुयारी मार्गात रेखाटण्यात आले आहेत. मुळशी तालुक्यातील भक्ती शक्तीचा संगम, जगप्रसिद्ध कुस्तीचे रेखाचित्र चित्रातून दाखवले आहे. (Pune) येथील भात शेती, पर्यटन स्थळे आणि देवदर्शन स्थळे दाखवली आहेत. मुळशी तालुक्यातील सर्व वैशिष्ट्ये पेंटिंगच्या रूपात या भुयारी मार्गातून दाखवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.